युवक नेते लक्ष्मण मुंडे यांना पितृशोक: निवृत्ती मुंडे यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
टोकवाडी येथील वीट उद्योजक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते लक्ष्मण मुंडे यांचे वडील निवृत्ती मानाजी मुंडे यांचे रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी ते 96 वर्षाचे होते.
टोकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी निवृत्ती मानाजी मुंडे हे अतिशय मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. वृद्धापकाळाने गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सोमवारी टोकवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. निवृत्ती मुंडे यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंडे परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी (पिंटू) मुंडे यांचे ते चुलते होत.
आज राख सावडण्याचा कार्यक्रम
दरम्यान कै. निवृत्ती मानाजी मुंडे यांचा राख सावडण्याचा विधी उद्या मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता टोकवाडी येथे होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा