येल्ड्यातील हंगामी वसतिगृहात अन्नातून विषबाधा
येल्ड्यातील हंगामी वसतिगृहात अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३७ वर
येल्ड्यातील हंगामी वसतिगृहात अन्नातून विषबाधा
अंबाजोगाई - (वसुदेव शिंदे)
तालुक्यातील येल्डा येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तयार केलेल्या हंगामी वसतिगृहात अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३७ वर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी सांगीतली. या वसतिगृहात एकुण ४० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यातील ३७ विद्यार्थ्यांना सायंकाळच्या सुमारास देण्यात येणाऱ्या भोजनातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यातून विद्यार्थ्यांना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. त्यांच्यावर तात्काळ उपचार करून उपचारार्थ त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी रूग्णालयात तात्काळ डॉक्टरांचा ताफा तैनात करून रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू केले. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा असून मजुरांची मुले हंगामी वसतीगृहामध्ये ठेवण्यात येतात. यातील विद्यार्थ्यांना रविवारी
सायंकाळी वसतिगृह चालकांनी या विद्यार्थ्यांना वरण, भात, भाकरी व वांग्याची भाजी याचे
भोजन दिले. भोजन झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास सदरील विद्यार्थ्यांना उलटी व चक्कर,
मळमळ होऊ लागल्यामुळे त्यांना मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान रुग्णालयात उपचारासाठी
दाखल केले. उपचारादरम्यान स्वारातीच्या डॉक्टरांनी सदरील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर सर्व
रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत असल्याचे मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी सांगितले.
अन्नाच्या विषबाधेतून उपचार सुरू असलेल्या रुग्णात मूलचंद रामप्रसाद चामनर (३०), प्रतिक्षा मुलचंद्र चामनर (२५), रूपाली बाबन वाघमारे (१५), सुरेश बाळु शिंदे (१२), श्रावणी लहू कांबळे (१०), विनोद दशरथ चामनर (१६), क्रांती दशरथ चामनर (२०), अभिशेक काशिम कांबळे (१४), श्लोक भाऊराव कांबळे (१२), स्वाती शिवाजी कांबळे (१३), अमोल भागवत कांबळे (९), रितेश शिवाजी कांबळे (१३), श्रावणी परमेश्वर चामनर (६), प्रांजली भागवत कांबळे (११), सानीया धम्मपाल हातागळे (८), राघव मुकुंद चामनर (७), राघव धम्मपाल हातागळे (७), प्राजंल शहाजी पाटुळे (९), श्रूती अविनाश कांबळे (१०), कृष्णा दिगांबर सोन्नर (५), राजपाल धम्मपाल हातागळे (९), अमृता सतेज गाडगे (१२) वीर सटवाजी कांबळे (१२), संस्कार नितीन कांबळे (११), अर्णव अनिल तरकसे (७), अंकिता अनिल तरकसे (९), सृष्टी मारूती खोंडवे (९), पृथ्वीराज रमेश शेंडगे (१०), कोमल रमेश शेंडगे (१३), सृष्टी विजय चामनर (१३), पृथ्वीराज ग्यानदेव चामनर (१०), ऋषीकेशकोमल रमेश शेंडगे (१३), सृष्टी विजय चामनर (१३), पृथ्वीराज ग्यानदेव चामनर (१०), ऋषीकेश गोविंद माने (१०), अर्णव शहाजी पाटुळे (१०), शितल युवराज लवटे (१३) या रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयाची टिम खबरदारीसाठी तैनात केली असून पुढील उपचाराखातर गरज पडल्यास त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील असे रुग्णालया प्रशासनाकडून सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा