गीता जयंती महोत्सव : सहभागी व्हा !

गीता परिवारच्या वतीने गीता जयंती महोत्सव मोक्षदा एकादशी निमित्त रंगभरण व फोटो डेकोरेशन स्पर्धा


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      गीता जयंती महोत्सव मोक्षदा एकादशी निमित्त गीता परिवार, परळी वैजनाथ यांच्या तर्फे रंगभरण व फोटो डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन गीता परिवारच्या वतीने करण्यात आले आहे.

      जिजामाता गार्डन, टॉवर जवळ, परळी वैजनाथ येथे रविवार, दि. ०८/१२/२०२४ रोजी रंगभरण व फोटो डेकोरेशन  स्पर्धा होणार आहे.प्रवेश वयोगटः १ ली ते ४ थी : विषय रंगभरण स्पर्धा ,५ वी ते ८ वीः विषय फोटो डेकोरेशन स्पर्धा  वेळः दुपारी ३ ते ५  स्पर्धेची फीः फक्त १० रुपये आहे.स्पर्धेसाठी रंग व डेकोरेशनचे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे. त्याचबरोबर मोक्षदा एकादशी विशेष कार्यक्रमः दि. ११/१२/२०२४ दुपारी ३ ते सायंकाळी ६ सामूहिक गीता पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.आर्य वैश्य महिला मंडळ व गीता परिवार तर्फेः आर्य वैश्य मंदिर, परळी वैजनाथ, जि. बीड येथे तरराजस्थानी महिला मंडळ व गीता परिवार तर्फे हनुमान मंदिर, मोंढा येथे गीतापाठ होणार आहे.
           सर्वांनी मोठ्या संख्येने या पवित्र व प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन गीता परिवार, परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सौ. श्वेता काबरा मो.99607 05777,सौ. सुनिता बंग मो. 78410 05377, सौ. ललीता जाजू मो.94237 77630, अर्चना रुद्रवार मो.94215 35102 यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार