संस्कृती विसरल्यामुळे विकृती वाढते - प्रशांत महाराज खानापूरकर
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)
सद्यःस्थितीत तरुण पिढी आणि समाजातील अनेक घटक संस्कृती विसरत आहे आणि संस्कृती विसरल्यामुळे विकृती वाढत आहे .असे प्रतिपादन प्रशांत महाराज खानापूरकर यांनी केले.
बिड जिल्ह्यातील व अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथे दक्षिण मुखी दत्त मंदिर संस्थान द्वारा आयोजित केलेल्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनात श्री संत तुकाराम महाराज यांच्या *दीन आणि दुर्बलासी / सुखरासी हरी कथा* // या अभंगावर त्यांनी निरूपण केले. पुढे बोलताना ते म्हणाले की ,समाजामध्ये तरुण पिढी ही अतिशय वाम मार्गाला जात आहे. व्यसनाच्या अहारी गेलेली पिढी समाजात विकृत कृत्य करत आहेत. या तरुण पिढीला आवरणे अवरून त्यांना सावरणे आणि त्यांचे प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे . सध्या तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी खूप प्रमाणात वाढत आहे याला कारण फिल्मी इंडस्ट्री मध्ये होणारे विकृत दर्शन आणि समाजाने विकृतीला दिलेला आश्रय यामुळे ही तरुण पिढी बर्बाद होत आहे. विकृती पेक्षा संस्कृती शिकवली पाहिजे. संस्कार, धर्म, न्याय,नीती याविषयी उद्बोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. संस्कृती टिकली तर समाजातील विकृती कमी होईल आणि अशांत झालेल्या समाज शांत होऊन गुण्यागोविंदाने नांदेल. असे प्रतिपादन प्रशांत महाराज यांनी केले. या कार्यक्रमाला माकेगाव आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती होती. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला श्री राजेसाहेब देशमुख ,दगडूसाहेब देशमुख आऊभैया देशमुख, व्यंकट देशमुख , दादासाहेब देशमुख,सरपंच , उपसरपंच,यांच्यासह परिसरातील व गावातील किर्तनकार , गायक, वादक,प्रतिष्ठित नागरिक भाविक भक्त उपस्थित होते. प्रशांत महाराजांच्या या सुंदर सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा