रा.काॅ.च्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
रा. काॅ.च्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पानगाव येथे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या भेटी घेतल्या.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, उपनगराध्यक्ष आय्युबभाई पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अनंत इंगळे, माजी नगरसेवक अजिज कच्छी, रवि मुळे, राज हजारे, सचिन मराठे, संतोष घोडके,सोपानराव रोडे, अलीभाई,सखाराम आदोडे,मंगेश मुंडे, विठ्ठल लोंढे,सुरज उपाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा