मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर !

 मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण: बीडच्या एसपींची तडकाफडकी बदली !



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    मस्साजोग प्रकरणात एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

 मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून विधिमंडळ अधिवेशनात हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले. बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाची कामकाजाची पद्धत यावरही प्रचंड प्रमाणात टीका झाली. बीडचे बिहार झाल्याच्या टीका विरोधकांनी केल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर आज सभागृहात सविस्तर उत्तर दिले. या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, कोणीही असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर या घटनेतील दोषी पोलीस अधिकारी,  कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही कारवाया केलेल्या आहेत. याचअनुषंगाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचीही तडकाफडकी बदली करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. दरम्यान, या प्रकरणात केज येथील पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी मात्र आपले कर्तव्य बजावल्याचे प्रत्यक्ष पुराव्यातून दिसत असल्याने चुकीच्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ नये यासाठी महाजन यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार दूर करत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी आपल्या उत्तरात सांगितले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार