संतोष देशमुख खून प्रकरणात अविनाश बारगळ यांची झाली होती बदली

 टॉपर आयपीएस अधिकारी नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक




संतोष देशमुख खून प्रकरणात अविनाश बारगळ यांची झाली होती बदली


बीड,  एमबी न्यूज वृत्तसेवा: संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासात कुचराई केल्याच्या ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतरबीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे.टॉपर आयपीएस अधिकारी असलेले नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक  असणार आहेत.

नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक राहणार असून ते यापूर्वी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते.आता बीड मधील कायदा सुव्यवस्था  सुरळीत करण्याचे आवाहन..कावत यांच्यासमोर आहे .काँवत हे 2017 सालच्या बँचचे टॉपर आयपीएस अधिकारी आहेत .अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते. 



     




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना