जाणून घ्या- पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया काय?| यापूर्वी कोणी कोणी भुषवलं हे मंत्रीपद ? |
पंकजा मुंडेंकडे महत्त्वाकांक्षी मंत्रालय !
पर्यावरण - हवामान बदल आणि पशुसंवर्धन खातं: पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया काय?
मानवतेच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या पैलूंवर काम करण्याची एवढी मोठी संधी !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
नव्या मंत्रिमंडळात महायुतीच्या तिन्ही प्रमुखांनी वजनदार खाती आपल्याकडे राखली. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद कायम ठेवलं आहे. तर एकनाथ शिंदेंनीही नगरविकास खाते आपल्याकडेच राखले आहे आणि यासोबतच गृहनिर्माण खातेही मिळाले आहे. तर अजित पवारांनीही अर्थखात्याची धुरा स्वत:कडेच ठेवली याव्यतिरिक्त त्यांना राज्य उत्पादन शुल्क खातंही मिळालं आहे. यावेळी प्रमुखांना नेत्यांना वगळता अन्य सर्व मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल झाली आहे. यातच विधानपरिषदेच्या एकमेव मंत्री ठरलेल्या पंकजा मुंडेंच्या पारड्यात महत्त्वाकांक्षी असे पर्यावरण मंत्रालय पडले आहे.
पंकजा मुंडे यांनी यापूर्वी मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. सर्वंकष जनहिताचे नवनवीन उपक्रम व नवनव्या संकल्पना राबवून त्या यशस्वी करुन दाखवणार्या मंत्री अशी त्यांची मंत्रीपदाची कारकीर्द राहिलेली आहे. त्यामुळेच नवोपक्रमशील व कल्पक पंकजाताई मुंडेंकडे पर्यावरणासारखे एक महत्त्वाकांक्षी खाते आले आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. २०१४ मध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे महिला बालकल्याण आणि ग्रामविकास खातं देण्यात आलं होतं. त्यानंतर आता यावेळी मात्र काहीस वेगळं खातं देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन हे खातं देण्यात आलं आहे.
● पंकजाताई मुंडेंची प्रतिक्रिया काय?
खातेवाटप झाल्यानंतर याबाबत मंत्र्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. या अनुषंगानेच पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया काय याबाबत उत्सुकता असतांनाच सोशल मीडियावर आभाराची पोस्ट करत त्यांनी आपली भावना व्यक्त केली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
● पंकजाताई मुंडेंच्या पोस्टचा आशय काय?
आपल्या हिंदीतील पोस्टमध्ये पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदीजी, आपण मला मानवी कार्य करण्याची संधी दिली आहेच. त्याहीपेक्षा गावात, राज्यात, देशातच नव्हे तर जगात मानवतेच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या पैलूंवर काम करण्याची एवढी मोठी ही संधी आहे. मानव, मानवता, जग आणि त्या पलीकडे काम करण्याची ही संधी आहे… मी कृतज्ञता व्यक्त करते. अशा अशयाची उदात्त भावना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
● पंकजाताई मुंडे यांची अशी आहे पोस्ट ....
"मानव के काम करने का अवसर तो मिला है पर @narendramodi जी आपने मानवता के अस्तित्व के लिए आवश्यक गाव, राज्य, देश ही नही दूनिया और उससे भी आगे की सोच पर काम करने का इतना बडा अवसर दिया ... मैं आभार व्यक्त करतीहू!!..@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde
@Ajit PawarSpeaks आप के मनपूर्वक आभार ...!! "
यापूर्वी पर्यावरण मंत्री म्हणून कोणीकोणी भुषवलं पद?
बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, गोपाळराव खेडकर, पी.के. सावंत, सदाशिव बर्वे, केशवराव सोनवणे, गोपाळराव खेडकर, प्रतिभाताई पाटील, मधुकर चौधरी, शरद पवार (दोनवेळा), वसंतदादा पाटील (तीन वेळा), पुरुषोत्तम डेकाटे ,प्रमिला टोपले, नरेंद्र तिडके, बाबासाहेब भोसले, सुशीलकुमार शिंदे, व्ही. सुब्रमण्यम, अभयसिंहराजे भोसले, जवाहरलाल दर्डा (दोन वेळा), विलासराव देशमुख, गणेश नाईक(तीन वेळा), राधाकृष्ण विखे, चंद्रकांत खैरे, स्वरुपसिंग नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, जयंत पाटील,संजय देवतळे, एकनाथ खडसे, रामदास कदम, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे (तीन वेळा), आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून पद भुषवलेलं आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा