कर्नाटकात घडली घटना: घटप्रभेत ऊसतोड मजुराचा मुकादमाकडून खून :दोघेही परळी तालुक्यातील रहिवासी

गोकाक जि.बेळगाव(कर्नाटक). २३ :

 गोकाक येथून जवळचअसणाऱ्या घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरीदरम्यान असणाऱ्या प्रख्यात दवाखान्याच्या आवारात ऊसतोडणी कामगार विकास बालासाहेब जोगदंड (वय २८, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याचा त्याच्याच गावाचा मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय ४७, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याने झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे.

            घटप्रभा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकास जोगदंड याने उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. दवाखान्यात दाखल करून जोगदंड दवाखान्या बाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरू गुरु सिद्धेश्वर मूर्ती जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास झोपला होता.

श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्या बाहेर आला आणि काही कळायच्या आत विकास जोगदंड च्या  डोक्यात चाळीस किलो पैक्षा मोठा दगड घातला.व छातीवर बसून दगडणे तोंड डोके ठेचू लागला हे पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने ताबोड तोब ढाकणे याला पकडले. घटप्रभा पोलिसांना माहिती दिली.ढाकणे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मृताचे वडील बालासाहेब मारुती जोगदंड यांनी घटप्रभा पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करीत आहेत.' दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण समजू शकले नाही. घटप्रभा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना