आपघाताचे प्रमाण वाढले.......
परळी -सिरसाळा रस्त्यावर दोन आपघात: एकात एक जखमी तर दुसर्या अपघातात एक जागीच ठार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी -सिरसाळा या एकाच रस्त्यावर काही अंतर व काही वेळेच्या फरकाने दोन वेगवेगळे आपघात घडले. एका आपघातात एक जण जखमी झाला तर दुसर्या एका अपघातात एक जागीच ठार झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रावर दि. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास तुकाराम मुंडलीक (सोनार), रा. खोकलेवाडी ता. गांगाखेड हे मोटार सायकलने जात असताना नाथरा पाटीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण पोलीस व रुग्णवाहिकने तातडीने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
दरम्यान याच वेळेच्या काही फरकाने सिरसाळा रस्त्यावरील रेवली फाट्यानजीक मोटार सायकलस्वार अपघातात जखमी झाला.ऋषी कुकडे रा.होळकर चौक धनगर गल्ली परळी वैजनाथ असे जखमीचे नाव आहे.परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यास स्वाराति रुग्णालय अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा