पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट !
मराठवाड्यासाठी केल्या 'या' मागण्या...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयानंतर 5 डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, सरकारच्या शपथ स्थापनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि मराठवाड्यासाठी मोठी मागणी केली.
पंकजा मुंडेंनी आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांचे अभिनंदन केले. पंकजा मुंडे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांच्याशी मराठवाड्यातील दुष्काळ निवारण आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास भाग आणि स्थलांतरित कामगारांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले.''पंकजा मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार?
भाजपच्या महाराष्ट्रातील फायरब्रँड नेत्यांमध्ये पंकजा मुंडेंचे नाव घेतले जाते. 2014-2019 मध्ये त्यांच्याकडे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी होती. यंदाच्या मंत्रिमंडळात पंकजाताई मुंडे यांचे मंत्रीपदीवर वर्णी लागणार अशी सुरुवातीपासूनच चर्चा आहे.त्यांचे मंत्रीपद फिक्स मानले जात आहे. दरम्यान आज झालेल्या भेटीत मंत्रीपदीबाबत चर्चा झाली नसल्याचे पंकजाताई यांनी सांगितले मात्र त्यांचे मंत्रीपद फायनल झाल्याचे बोलल्या जात आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा