साक्षी सुलाखे हिची न्यायालयीन कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार             


        

 गेवराई :- बीड जिल्हा  सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदी निवड झाल्याबद्दल साक्षी यशवंत( बंडू ) सुलाखे हिची निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल बोर्डे यांनी साक्षी सुलाखे हिचा पुष्पहार, शाल श्रीफळ व पेढे भरून निवासस्थानी सत्कार करण्यात आला.                     

   याप्रसंगी साक्षी तिचे आई वडील सौ कल्पना सुलाखे व वडील यशवंत सुलाखे परिवारातील सदस्य श्वेता सुलाखे, विश्वांभर सुलाखे, राजेश जोशी संगीता जोशी अर्चना देशमुख सुनंदा कुलकर्णी अनिता कुलकर्णी अशोक देऊळगावकर मोहन राजहंस आदी हजर होते. दिनांक पाच डिसेंबर रोजी निवड झालेली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक झाले आहे व सर्वांनी अभिनंदन केले आहे.                      

       साक्षी हिने प्राथमिक शिक्षण चिंतेश्वर विद्यालय गेवराई येथे व त्यानंतर आर बी अट्टल कॉलेज येथे बीएससी ची पदवी घेतलेली आहे. घरची परिस्थिती नाजूक असताना देखील खडतर परिश्रम घेऊन हलक्याचे जीवन असताना  मेहनत करून अभ्यासात सातत्य असल्यामुळे साक्षी हिला यश मिळाले आहे असे तिचे वडील यशवंत सुलाखे यांनी प्रत्यक्ष सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना