पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार --------

 ना.पंकजाताई मुंडे 'इज इन ॲक्शन'; मंत्रिपदाची जबाबदारी येताच विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक


पर्यावरण व वातारणीय बदलाबांबतच्या योजना राबविण्याबाबत सुनियोजित आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश


 मुंबई,।दिनांक २४।

पर्यावरण व वातारणीय बदल या विभागातील राबविण्यात येणा-या योजना,भविष्यातील ध्येय धोरणे,घनकचरा व्यवस्थापन,माझी वसुंधरा अभियान,पाणी,हवा प्रदुषण,नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमां विषयी सुनियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी विभागांचा आढावा घेताना दिल्या.


   खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी येताच ना. पंकजाताई मुंडे यांनी आज सहयाद्री अतिथीगृहात पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना त्या  म्हणाल्या की,राज्यातील घनकचरा व्यवस्थापन,पाणी,हवा प्रदूषण नियंत्रण,नदी व तलाव संवर्धन,पर्यावरण जतन व  संवर्धन जनजागृतीपर उपक्रम,राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना,सागर तटीय विशेष राखीव क्षेत्र नियमन,स्थानिक स्वराज्य संस्थाचे घनकचरा व्यवस्थापन,प्लॅस्टीक निर्मुलन,राज्य नदी संवर्धन योजना,महाराष्ट्र पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र,सृष्टी मित्र पुरस्कार,माझी वंसुधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे,पर्यावरणपूरक वातावरणासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे,जैविक कचरा नियमावली,पर्यावरण  जतन व संवर्धनासाठी राज्य, जिल्हा व ग्रामपातळीवर समित्या कार्यरत करणे, पर्यावरण क्लब स्थापन करणे.पाणथळ जागांचे संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न करणे याबाबत सविस्तर नियोजन करा.त्यानुसार राज्यातील पर्यावरण विभागातील कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही त्या म्हणाल्या.


पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार

--------

राज्यातील पशुसंवर्धन विभागाचाही यावेळी त्यांनी आढावा घेतला.विभागाची स्थापना आणि वाटचाल विभागाची ध्येय धोरणे,राज्यातील पशुधन,राज्य व केंद्र पुरस्कृत योजना,एकात्मिक सर्वेक्षण योजना  पशुगणना,जिल्हा वार्षिक योजना,विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प,पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पकंजा मुडे यांनी यावेळी सांगितले.


 यावेळी बैठकीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम,पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,पर्यावरण  व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


   यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विभागाच्या योजना,सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार