...तर मी पालकमंत्री म्हणून बीडलाही जाईल पण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?

नागपूर: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि संपूर्ण तपास सुरू असतानाच फडणवीसांनी आज नागपुरात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे. 

कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद फडणवीसांना हवं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे, गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो, अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार