इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 जलयुक्त शिवार घोटाळा; २४ जणांवर गुन्हा दाखल

सात वर्षांपूर्वी झाला होता १८ लाख २७ हजार ८०० रुपयांचा अपहार

परळी : सात वर्षांपूर्वी परळीतालुक्यातील गावामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामात १८ लाख २७ हजार ८०२ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून २४ जणांविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात २ डिसेंबर २०२४ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २०१५ ते २०१७ दरम्यानच्या काळात झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या प्रकरणाची वेळोवेळी चौकशी झाली व दोषी अधिकारी, कर्मचारी तसेच गुत्तेदारांकडून रक्कमही वसूल करण्यात आली होती. तसेच गुन्हेही दाखल करण्यात आले होते.

त्यामधील राहिलेल्या लोकांविरोधात सुनावणीच्या वेळेस लोकआयुक्तांकडे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार २ डिसेंबर रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

२४ जणांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, माती नाला बांध, सिमेंट नाला बांधच्या शासकीय कंत्राटाच्या कामामध्ये बनावट व खोटे दस्तऐवज यांचा वापर करून ती खरी आहेत असे भासवून १८ लाख २७ हजार ८०२ रुपयांचा अपहार केला.

याप्रकरणी परळी तालुका कृषी अधिकारी रवी विष्णू मुंडे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार लोखंडी सावरगाव, माजलगाव, नंदागौळ, अस्वलआंबा, परळी, अंबाजोगाई, सारणी, वानटाकळी, सोनहिवरा व अन्य ठिकाणच्या व मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सचिव, तसेच गुत्तेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             या प्रकरणाचा तपास परळी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!