ऐतिहासिक क्षण: बहिण पंकजा मुंडे सह भाऊ धनंजय मुंडेही घेणार मंत्री पदाची शपथ
परळी वैजनाथ प्रतिनिधी भाजपाच्या कोट्यातून बहीण पंकजा मुंडे यांना मंत्रीपदासाठी शपथ घेण्याचा निरोप सकाळीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदा बाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असताना आता पक्षाच्या वतीने अधिकृतपणाने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहा असा फोन आलेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला दुग्ध शर्करा योग आला असून मुंडे बंधू भगिनी दोघेही कॅबिनेट मंत्री म्हणून आज दुपारी चार वाजता नागपुरातील राजभवनात शपथ घेणार आहेत. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने धनंजय मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेते असल्याने त्यांची भाजपाकडून मंत्रिमंडळात वर्णी लागणार हेही निश्चित मानले जात होते. अपेक्षेप्रमाणे आता मुंडे बंधू-भगिनींचा दोघांचाही मंत्रिमंडळात समावेश होत असून बीड जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचा अधिकृत फोन पक्षाच्यावतीने त्यांना आला असून मुंडे बंधू भगिनी आज एकत्रच मंत्रीपदाची शपथ घेणार असून हा सुद्धा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा