संगीत नाटकअकादमी, दिल्ली तर्फेकला प्रवाह महोत्सवाचे अंबाजोगाईत आयोजन

-----------------------------------

दिग्गज कलावंतासह  संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे  आणि भरतनाट्यम कलावंत  सौ.अनुराधा विनोद निकम यांचेही सादरीकरण

-----------------------------------

(अंबाजोगाई प्रतिनिधी):-संगीत नाटक अकादमी, संस्कृति मंत्रालय,भारत सरकार,(दिल्ली) तहसील कार्यालय, अंबाजोगाई व श्री. योगेश्वरी देवल कमेटी आणि विश्वस्त मंडळ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहर अंबानगरीत 2 दिवसीय "कला प्रवाह महोत्सव" आयोजित केला आहे. या महोत्सवा मध्ये सांप्रदायीक भजन, शास्त्रीय गायन,शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य या कलेचा आविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे. देशभरातील नामवंत कलावंतांची हजेरी या महोत्सवात असणार आहे.

भरतनाट्यम कलावंत  सौ.अनुराधा विनोद निकम या कार्यक्रमात आपला भरतनाट्यम आविष्कार सादर करणार आहेत.त्यांनी प्रख्यात भरतनाट्यम गुरू शारदापुत्र डॉ. विनोद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महोत्सवात कला सादरीकरण केले आहे. तसेच प्रा. शंकर सिनगारे आपली संगीत सेवा सादर करणार आहेत.संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे हे पं.शिवदास देगलूरकर यांचे शिष्य असून त्यांनी विविध सांगीतिक उपक्रमात सहभागी होऊन कला सादरीकरण केले आहे. संगीत नाटक अकादमी आयोजित कला प्रवाह या कार्यक्रमात त्यांचे भजन सादर होणार आहे.ही गौरवाची बाब आहे.

दि. 25 व 26 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 06:00 वा.

श्री.योगेश्वरी देवी मंदिर परिसर, अंबाजोगाई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दि.25 दिसंबर 2024 बुधवार रोजी

वैदिक मंत्रोच्चार:- नवनाथ जोशी, श्री नृसिंह सरस्वती सर्वज्ञ दासोपंत गुरुकुल वेद पाठशाला, अंबाजोगाई ,भजन:- गोदावरी मुंडे, परभणी ,कर्नाटक गायन:- बालासुब्रमण्यम शर्मा, बेंगलुरु,गणगौर नृत्य:-तृप्ति नागर, उज्जैन, मध्य प्रदेश,कथक नृत्य:- स्मृति राज, पुणे,भरतनाट्यम :- अनुराधा निकम, पंचमवेद प्रतिष्ठान, अंबाजोगाई  तसेच 26 डिसेंबर 2024गुरुवार रोजी वैदिक मंत्रोच्चार:- नवनाथ जोशी, श्री नृसिंह सरस्वती सर्वज्ञ दासोपंत गुरुकुल वेद पाठशाला, अंबाजोगाई,भजन :- प्रा.शंकर  सिनगारे व साथी, अंबाजोगाई,हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत:- राजा काळे, महाराष्ट्र,सत्रिय नृत्य :देविका पी. बोरठाकुर, पुणे,मयूरभंज छाऊ :-सुभाश्री मुखर्जी, ओडिसा आदी मान्यवर कलावंत आपली कला सादर करणार आहेत.

 सर्व सांप्रदायीक भाविक भक्त व कला प्रेमी आणि रसिकांनी या महोत्सवास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच समन्वय समिती व पंचमवेद प्रतिष्ठानचे प्रमुख शारदापुत्र डॉ.विनोद कमलाकर निकम,रोहित देशमुख, दिलीप भांगडिया, संजय अंकुलवार,ह.भ.प. अच्युत आप्पा जोशी,वारकरी संप्रदाय,वेदपाठ शाळा,दत्त मंदिर, दासोपंत संशोधन मंडळ अंबाजोगाई  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना