मस्साजोग सरपंच देशमुख खून प्रकरण: पोलिसांनी पुण्यातून तिसऱ्या आरोपीस घेतले ताब्यात
केज - मस्साजोग सरपंच देशमुख खून प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून तिसऱ्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. जिल्हा हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग खून प्रकरण तपासात पोलिसांनी आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीस बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात बेड्या ठोकल्या. प्रतिक भीमराव घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
खून केल्यानंतर आरोपी पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केलेली आहे. आतापर्यंत एकूण तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा