कचरूलालजी राठी यांचे निधन
प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगरमधील श्रेयनगर येथील ज्येष्ठ नागरिक कचरूलालजी मदनलालजी राठी (वय ८९, मूळ रा. परळी वैजनाथ, गणेशपार) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अमेरिकास्थित राजकुमार व रामप्रसाद ही दोन मुले, कृष्णा, मंगल या विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा