वनपरिक्षेत्र कार्यालया परिसरात श्री. दत्त जयंती उत्साहात साजरी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
वनपरिक्षेत्र कार्यालया परिसरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी दत्तजयंतीनिमित्त पुजा व आरती करण्यात आली.
परळी वनपरिक्षेत्र कार्यालया परिसरात श्री दत्त जयंती भक्तीभवाने साजरी करण्यात आली. यावेळी परळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्री मनोहर पुंड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी इरिगेशन कॉलनी, विद्यानगर, तहसील कॉलनी,परिसरातील कर्मचारी, महिला, पुरुष नागरिक मोठ्या भक्तीभावाने उपस्थित होते. महाआरती नंतर वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याचाही भाविकांनी लाभ घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा