राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड

मुंबई: भाजप नेते राम शिंदे  यांची विधान परिषदेच्या  सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा आज गुरुवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले.

अडीच वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी अखेर भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही. शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची कालच निवड निश्चित झाली होती. आज, गुरुवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आल्यापासून सभापतिपद रिक्त होते. मंत्रिमंडळातील खातेवाटपाप्रमाणे महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये सभापतिपदासाठी चढाओढ सुरू होती.उपसभापती डॉ. नीलम गो-हे  यांच्या नावाची सभापतिपदासाठी चर्चा होती. तसे प्रयत्नही शिंदे गटाकडून करण्यात आले. मात्र, विधान परिषदेतील भाजपचे संख्याबळ पाहता त्यांच्याकडूनच या पदावर दावा केला जाणार, हे निश्चित मानले जात होते. भाजपमध्ये राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावांचीही चर्चा होती. तरीही भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून शिंदे यांच्या नावाला पसंती दिली गेली. त्यानुसार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे अर्ज सादर केला. तर आज त्यांच्या निवडीची एकमताने अधिकृत घोषणा झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार