धर्मगुरू अमृतआश्रम स्वामी यांचा महासाधू गाणपत्य संत श्री मोरया गोसावी संस्थानकडून सत्कार
महासाधू गाणपत्य संत श्री मोरया गोसावी यांच्या ४६३ व्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ धर्मगुरू अमृत आश्रम स्वामी (हरितस् गोत्री शाळीग्राम नवगण राजुरी) व श्री वरदराज श्रीकांत देव लिंबागणेशकर यांनी पुणे पिंपरी चिंचवड येथे जाऊन श्रद्धा पूर्वक श्री संत मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
याप्रसंगी मोरया गोसावी यांच्या वंशातील श्री मंदार देव महाराज, जितेंद्र देव व प्रकाश देव यांनी मनःपूर्वक स्वागत केले . व संस्थानाधिपती मंदार देव महाराज म्हणाले की आमच्याच हरितस् गोत्री शाळीग्राम कुळातील अनेक घर विस्तार पावलेले आहेत त्यापैकी नवगन राजुरी व लिंबागणेश हे दोन हल्ली जोशी म्हणविणारे गणपती भक्त आहेत. आमच्याच घराण्यातील एक दंडी संन्याशी गाणपत्य संप्रदायाचे आहेत. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आपण सदैव चिंचवड संस्थानाला दर्शनासाठी येत जावे व आपण जो ग्रंथ प्रकाशित करणार आहात त्यालाही माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद मी मोरयाच्या कृपेने प्रदान करतो आहे असे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा