महाराष्ट्र भाजपचे मुंडे - महाजन ते देवेंद्र पर्व

 महाराष्ट्र भाजपचे मुंडे - महाजन ते देवेंद्र पर्व !


1999 साली कॉंग्रेसमधे उभी फुट पडुन झालेली राष्ट्रवादी कॉंग्रेस ची पहिली निवडणुक झाली. सत्तेत असलेल्या युती सरकार ला बहुमतासाठी काही जागा कमी होत्या. 12 अपक्ष आमदार तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत होते. गोपीनाथरावांना मुख्यमंत्री पद दिले तर राष्ट्रवादी पक्ष देखील पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू होत्या. “शरद पवारांची अभद्र युती कडे वाटचाल “ अशी दै.लोकमत ची हेडलाईन त्यावेळेस होती.मात्र, बाळासाहेब ठाकरे मात्र दुराग्रह सोडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार नाहीतर विरोधी पक्षात बसू अशी जाहीर भूमिका.मुंडे- महाजन - पवार यांची शिष्टाई अयशस्वी झाली.

शिवसेना-६९, भाजप -५६

कॉग्रेस-७५, एनसीपी-५८

अपक्ष-१२ व बाकी इतर.

असं गणित असुनही ठाकरी बाण्यामुळे युती ला विरोधी पक्षात बसायची वेळ आली.सामना मधून गोपीनाथ मुंडेंवर आडून आडून कधी ऊघड ऊघड टिका केली गेली. मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात हे शिवसेनेला कधीच मान्य नव्हते. 2014 साली केंद्रात मोदी सरकार विराजमान झाल्यानंतर देखील मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात या चर्चेवर शिवसेनेने टिका केलेली,जाहीर उपहास केला.


साल 2024 - 1999 साली कॉंग्रेस राष्ट्रवादी यांची एकत्रित ताकत जितकी होती तितकं संख्याबळ आज एकट्या भाजप चं आहे. आणि गोपीनाथ मुंडेंच्या मार्गावर त्यांच्या समक्ष सुरुवात केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक कसोटीची निवडणूक लिलया जिंकली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी अशी ऊभी फुट त्यातच लोकसभा निवडणुकांचा पराभव गाठीशी असताना  ब्राम्हण या अकारण तिरस्कृत अल्पसंख्य वर्गाचे फडणवीस यांनी केंद्रीय व राज्यातील नेत्यांसह केलेली चाणाक्ष मांडणी विजयाचं अशक्य कोडं सोडवणारी ठरली.


जागोजागी उमेदवार निवडी , मित्र पक्षांसोबत समन्वय, पंकजा मुंडे सारख्या महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांवर विश्वास ठेवून मराठवाड्यात घेतलेल्या फक्त दोन सभा यातून देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास व ग्राऊंड रिपोर्ट यंत्रणा यांचा अंदाज येतो.

         ओबीसी बिगर मराठा मते महायुतीच्या मराठा उमेदवारांना पडली हे लोकसभा निवडणुकीत न साधलेले गणित विधानसभेत साधलं. निकाल दणदणीत असले तरी ते अनपेक्षित नाहीत.निकाल मध्य प्रदेश सारखे असले तरी देवेंद्र फडणवीसांना शिवराजसिंहांसारखं डावलणं शक्य नाही.


देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असताना ज्या अग्निपरीक्षा मधून तावून सुलाखून निघाले आहेत त्यातून त्यांना ही तिसरी संधी विक्रमी तर ठरणार आहे पण ही एक्या नव्या अध्यायाची सुरुवात देखील ठरु शकेल असं मंत्रीमंडळ व राज्यकारभार ते करुन दाखवतील हा भाजपप्रेमींना ठाम विश्वास आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार