अंबाजोगाई शहराच्या जवळ बुटेनाथ दरिमथ्ये बनावट दारूच्या कारखान्यावर छापा, ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या धाडीने शहरात खळबळ
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने अंबाजोगाई शहरातील बुट्टेनाथ दरी मध्ये असलेल्या बनावट दारू कारखान्यावर धाड टाकून ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्या मुळे शहरात खळबळ उडाली आहे. मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड विश्वजीत ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे मौ. बुट्टेनाथ दरी येथे काटवन झाडीत असलेल्या गोडावून शेडमध्ये छापा टाकत, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रं. ०२ बीड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माजलगाव, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांच्या पथकाने कारवाई करत छापा टाकला असता सदरील गोडावून पत्री शेडमध्ये खालील प्रमाणे मुद्येमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या मध्ये १) बनावट देशी दारु रॉकेट मद्याच्या १०५०० बॉटल (१०५ बॉक्स) त्याची अं.कि. रु. ३६७५००/- २) एक जेएसएल जिंदाल स्टेनलेस कंपनीचे स्वयंचलित सिलींग, फिलींग व बॉटलींग मशीन अं.किं. रु.१५००००/- ३) २०० लि. मापाचे स्पीरीटने भरलेले प्लास्टीक बॅरल अं.किं. रु. २५०००/- ४) २०० लि. मापाचे १२रिकामे प्लास्टीक बॅरल अं.किं. रु. ६०००/- ५) ९० मिली क्षमतेच्या १००८०० प्लास्टीकच्या रिकाम्या बाटल्या अं.किं. रु. १००८००/- ६) देशी दारु रॉकेटचे ३०००० बुचे अं.किं. रु. ३००००/- ७) देशी दारु रॉकेटचे ८०००लेबल अं.किं. रु. १६०००/- ८) २००० लि. व ५००लि. चे एकुण 3 पाण्याचे बरॅल अं.किं. रु. ९०००/- ९) पाण्याची मोटार २ नगर अं.किं. रु. १००००/- १०) प्रवरा प्रिंट चे ६० टेप रोल अं.किं. रु. ३०००/- ११) देशी दारु रॉकेट बॉक्स चे पुठ्ठे १०००नग अं.किं. रु. २०००/- १२) ५ अल्कोहोल मीटर अं.किं. रु. २५००/- १३) विविध कंपनीचे ४ भ्रमणध्वनी अं.किं. रु. ७५०००/- १५) एक किया कंपनीचे सेलटॉस चारचाकी कार जिचा नोंदणी क्रं. एमएच-१२ आरवाय- ४४०६ अं.किं. रु. १००००००/- १६) एक अशोक लेलँड कंपनीचे आयशर टेम्पो ज्याचा नोंदणी क्रं. एमएच-४० सीडी ३४२१ अं.किं. रु. १७०००००/- १७) १० लिटर क्षमतेचे इसेंस ने भरलेले प्लास्टीक कॅन अं.किं. रु. ७५००/- , १८) पाण्याचे प्लास्टीकचे पाईप- ५ नग अं.किं. रु. २५००/- ,१९) एक आर.ओ. पाणी फिल्टर मशीन अं.किं. रु. ५००००/- असा एकुण रु.३५५६८००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केलाआहे.
या गुन्ह्यातील आरोपी १) आकाश गोवर्धन नेहरकर, वय २९ वर्षे, रा. गांधीनगर, अंबाजोगाई जि. बीड, २) दिलीप शांतीलाल पवार, वय १७ वर्षे, रा. भोईटी ता. शिरपूर जि. धुळे , ३) विकेश रघु बा्रम्हणे, वय : १७ वर्षे, रा. भोईटी ता. शिरपूर जि. धुळे, ४) जयम लालू पावरा, वय १७ वर्षे, रा. महादेव दोंडवाडा ता. शिरपूर जि. धुळे ५) किरण दिलीप पावरा, वय १५ वर्षे, रा. भोईटी ता. शिरपूर जि. धुळे, ६) ईश्वर भाया पावरा, वय १७ वर्षे, रा. महादेव दोंडवाडा ता. शिरपूर जि. धुळे यांना अटक करण्यात आली असुन पप्पू कदम व दिनेश गायकवाड हे फरार झाले असुन त्याचा शोध सुरु आहे. या आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई विश्वजीत ए. देशमुख, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली, डी.डी. चौरे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रं. ०२ बीड, श्री. आर.बी. राठोड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड, डी.आर. ठोकळ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई, ए.एल. कारभारी, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भ.प. क्रं. ०२ बीड, तसेच आर.बी. कदम स.दु.नि., जवान- एस.व्ही. धस, आर.ए. जारवाल, बी.के. पाटील, आर.एम. गोणारे, के.एन. डुकरे, एस.व्ही. लोमटे, डी.एस. वायबट, ए.पी. कदम, श्रीमती एस.एस. ढवळे, आर.जी. मुंडे, एस.एस. ढोले, यांनी सदरील कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास श्री. डी.डी. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रं. ०२ बीड हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा