मंत्रिमंडळात मुंडे व कदम परिवारातील दुसर्या पिढीचा असाही एक योगायोग !
मुंबई- राजकारणामध्ये अनेक बाबींची पुनरावृत्ती होत असते किंवा एका घटनेची साधर्म्य सांगणारी दुसरी घटना काळाच्या ओघात घडताना दिसते. काही योगायोग हे अधोरेखित होत असतात. एकाच मंत्रिमंडळात मुंडे बहिण भाऊ कॅबिनेट मंत्री असा एक योगायोग असताना मुंडे व कदम परिवारातील दुसर्या पिढीच्या बाबतीतही एक योगायोग बघायला मिळत आहे.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाचे राज्यमंत्री म्हणून योगेश रामदास कदम यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांनी आज धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. स्व. गोपीनाथराव मुंडे राज्याचे गृहमंत्री असताना रामदास भाई कदम हे त्याच खात्याचे राज्यमंत्री होते, आज धनंजय मुडे यांच्याकडे ज्या विभागाचा कार्यभार आहे त्याच खात्याचे राज्यमंत्रीपद योगायोगाने श्री. योगेश कदम यांना मिळालेले आहे. मुंडे आणि कदम कुटुंबातील हा योगायोग दुसऱ्या पिढीपर्यंत ही चालत आलेला दिसुन येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा