पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द!
मुंबई, प्रतिनिधी...
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले आहे.या अनुषंगाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयातील आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, "माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांचे योगदान देशवासियांना सदैव स्मरणात राहील. आदरांजली म्हणून माझे मंत्रालयाच्या दालनातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत याची नोंद घ्यावी. सर्वांनी सोमवार नंतर भेट घ्यावी ही विनंती."
-पंकजा गोपीनाथ मुंडे.
मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन -महाराष्ट्र राज्य.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा