मजुरीसाठी शेतात गेलेल्या महिलांच्या ॲटोला अपघात: सहा महिलांसह चालक जखमी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी शहरातील सिध्दार्थ नगर व फुलेनगर भागातील महिला शेतातुन काम करुन परत येत असलेल्या ॲटोला झालेल्या अपघातात सहा महिला व ॲटोचालकासह सातजण जखमी झाल्याची घटना बुधवार दि.४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता घडली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, परळी शहरातील सिध्दार्थ नगर व फुले नगर येथील महिला कापूस वेचणीसाठी ग्रामीण भागात जातात. बुधवारी सकाळी कापूस वेचणीसाठी गेलेल्या सांची दिपक शिंदे रा. सिध्दार्थनगर, सोनाली महादेव सोनवणे रा. फुलेनगर, पुजा विक्रम मस्के रा.फुलेनगर परळी, निलाबाई विठ्ठल सोनवणे रा.सिध्दार्थ नगर, सत्यशिला देवराव सोनवणे रा.सिध्दार्थनगर, अंजना सुभाष मिसाळ रा.फुलेनगर या महिला विक्रांत माणिक रोडे रा. ब्रम्हवाडी याच्या ॲटोतुन परळीकडे येत असताना सायंकाळी ७.१५ वाजता परळी जवळील धर्मापुरी फाटा येथे रस्त्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी समोरुन येणार्या कारने धडक दिल्याने वरील सहा महिला व ॲटोचालक जखमी झाले. सर्व जखमींवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
जखमीपैकी सांची दिपक शिंदे,सोनाली महादेव सोनवणे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अपघाताचे वृत्त कळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा