परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजींच्या हस्ते श्रीमुर्ती प्राणप्रतिष्ठा


 ⟩⟩ संत-महंतांची विशेष उपस्थिती ; काल्याचे कीर्तनाने  उद्या समारोप.  

परळी | प्रतिनिधी
दि.४ डिसेंबर २०२४

तालुक्यातील श्री क्षेत्र दत्तधाम, सारडगाव येथे सोमवार (दि.२) पासून संत साहित्यिक तथा प्रसिद्ध कथावाचक विद्यावाचस्पती स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य श्री दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आज गुरुवार दि.५ रोजी बद्रीनाथ येथील परमाराध्य परमधर्माधीश उत्तराम्नाय ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामिश्रीः अविमुक्तेश्वरानन्दः सरस्वती १००८ यांची विशेष उपस्थिती लाभणार असून स्वामीजींच्या शुभहस्ते विधिवत महापुजेने श्री दत्तात्रय भगवानजींच्या त्रिमुखी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

प्राणप्रतिष्ठापनेनंतर जगद्गुरु शंकराचार्य स्वामिश्रीः अविमुक्तेश्वरानन्दः सरस्वतीजी यांच्या रसाळ वाणीत भाविकांना अमृततुल्य प्रवचनाचा लाभ घेता येणार आहे. प्रसंगी वेदांत आश्रम बहादुरगड, हरियाणा, हरिद्वार आणि अखिल भारतीय संत समितीचे उपाध्यक्ष प.पू महामंडलेश्वर स्वामी देवेंद्रानंदगिरी महाराज, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष ह.भ.प मारुतीबाबा कुरेकर, प.पू वेदांताचार्य विद्यावाचस्पती डॉ.माणिक शास्त्री मुखेकर तसेच उपस्थित संत महंतांच्या शुभ हस्ते कलशारोहण व महापूजा संपन्न होईल होईल.

या कार्यक्रमास श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत ह.भ.प डॉ.नामदेव शास्त्री सानप, कृषिमंत्री मा.धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे, माईर्स एमआयटी पुणे चे मा.कार्यकारी अध्यक्ष राहुल भैया कराड, खा.भागवतराव कराड, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.संजय दौंड यांच्यासह मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

मूर्तीप्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व महापूजेनंतर लगेचच संत साहित्यिक तथा प्रसिद्ध कथावाचक विद्यावाचस्पती स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भव्यदिव्य चार दिवसीय कार्यक्रमाचा समारोप होईल.

श्रद्धा, भक्ती, आणि अध्यात्मिक उन्नतीचा महोत्सव असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास नंदनंज, सारडगावसह परळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यात्मिक चैतन्याची अनुभूती घ्यावी असे आवाहन श्री दत्तात्रय भगवान भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!