शस्त्रधारकांनी अटी व शर्तीचा भंग करू नये - पो.नि.नाचण
हवेत गोळीबार: व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
शस्त्रधारकांनी अटी व शर्तीचा भंग करू नये - पो.नि.नाचण
परळी प्रतिनिधी.......
स्वतःच्या परवानाधारक रिव्हालवरमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकाच्या आदेशानुसार परळी शहर पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान परवानाधारक शस्त्र धारकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी व नियमाचा भंग करू नये. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन पोलीस निरीक्षक नाचन यांनी केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोशल मीडियावर रिवाल्वर मधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली आणि याबाबत त्यांनी शहर पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या. त्यानंतर परळी शहर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने माहिती काढल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून कैलास फड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 24, 527, 30 आर्म्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणानंतर परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी परळी शहरातील सर्व शस्त्र परवानाधारकांना आवहान केले आहे की, बीड जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या शस्त्र नियम व अटीचे पालन करावे. याबरोबरच जर शहरात कोणाकडे अवैध शस्त्र असतील तर त्याचेही नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. शर्त व अटीचा भंग करणाऱ्या शस्त्र परवानाधारकावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही नाचण यांनी दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा