पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची माहिती
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार
दोन आरोपी अटक उर्वरित आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना
दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची माहिती
पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनात घेतले मागे: वाहतूक सुरळीत
केज, एमबी न्यूज वृत्तसेवा : तालुक्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.. जे प्रमुख आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील पाठवण्यात येणार आहे.. तसेच या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असून विशेष सरकारी वकिलाची देखील नियुक्ती केली जाणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी या ठिकाणी ग्रामस्थांना दिले आहे. पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतर मंजरसुंबा ते केज रोडवर गेल्या 12 ते 14 तासापासून सुरू असलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला असून आता वाहतूक देखील सुरळीत झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा