गौरव मल यांना पितृशोक; गिरधारीलाल मल यांचे निधन
परळी/ प्रतिनिधी-
विवेकानंद नगर येथील रहिवासी गौरव आणि मनोज मल यांचे वडील गिरधरीलाल मल यांचे आज (दि.२०) सकाळी औरंगाबाद येथे उपचार घेत असताना निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. स्व. गिरधरलालज मल यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, चार बहिणी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व. गिरधरलाल मल ह्यांचा धार्मिक कार्यात विशेष सहभाग होता. संयमी आणि शांत वृत्तीचे म्हणून ते सर्व परिचित होते. मल परिवारावर पडलेल्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
अंत्यसंस्कार
दरम्यान, आज शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी परळीतील राजस्थानी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सकाळी 10 वा. त्याचे राहते घर स्वामी विवेकानंद नगर येथून अंत्ययात्रा निघेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा