सर्व पक्षीय,व्यापारी,आंबेडकर अनुयायीनी पुकारला बंद
परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ शुक्रवारी परळी बंदची हाक
सर्व पक्षीय,व्यापारी,आंबेडकर अनुयायीनी पुकारला बंद
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळ भारतीय संविधान पुस्तेकीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या संविधान पुस्तिकेची एका नराधमाकडून विटंबना करण्यात आली. यामुळे आम्हा भारतीयांच्या भावना दुखावल्या असुन या नराधमाला कडक शासन करण्यासाठी परळीतील सर्व पक्षीय,व्यापारी महासंघ व आंबेडकर अनुयायांच्या वतीने शुक्रवार दि.13 डिसेंबर रोजी परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
आज बुधवार दि.11 डिसेंबर रोजी परळीतील सर्व पक्षीय,व्यापारी महासंघ व आंबेडकर अनुयायांच्या वतीने नेते,पदाधिकारी कार्यकर्ते यांची व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.13) परळी बंदची हाक देण्यात आली असुन या घटनेतील आरोपीला कडक शासन करण्यासाठी जलद न्यायालयात हे प्रकरण चालवून या देशद्रोही मनोविकारी नराधमाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अतिगंभीर कडक शासन तर करावेच परंतु या घटनेमागे कोणाचा विकृत मास्टरमाईंड आहे का याचा ही तपास करावा या मागणी करण्यात आली. या अनुषंगानेच शुक्रवारी परळी बंदची हाक देण्यात आली असुन याबाबतचे निवेदन सर्व पक्षीय, व्यापारी,आंबेडकर अनुयायांच्या वतिने तहसीलदार व पोलीसांना देण्यात आले आहे.तरी परळी शहरातील सर्व व्यापरी बांधवांनी या बंद मध्ये सहभागी होऊन या देशद्रोही घटनेचा निषेध नोंदवावा असे आवाहन ही सर्व पक्षीय,व्यापारी,आंबेडकर अनुयायीनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा