प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीसांची घोषणा होताच मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय ?


राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र आहे. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर झालं आहे. आज भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील.आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत होते म्हणून आम्ही त्यांचा विरोध केला. सत्तेत असतो त्याच्याशीच भांडावं लागतं. सरकार म्हणून आरक्षण देणारे ते होते म्हणून आम्ही त्यांच्याशी भांडलो. कारण मराठा समाजाच्या गोरगरीबाच्या आरक्षणाचा प्रश्न होता. मी पुढेही भांडणार आहे आणि नुसतं भांडण नाही तर सोडणार सुद्धा नाही. सरकारला गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागतील. त्यामुळे सरकारमध्ये कोणी पण कोणत्याही पदावर बसू दे मी सोडणार नाही. असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.   


• उपोषण होणार म्हणजे होणार!- मनोज जरांगे

उपोषण 100% अंतरवलीत होणार. पण थोडं पुढे जायचं असे काही लोक म्हणतात. आझाद मैदानावर उपोषण होण्याची देखील शक्यता आहे. उपोषण होणार असून ते सामूहिक उपोषण होणार आहे. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. असेही मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. मी कधीच ओबीसी बांधव आणि त्या समाजाला विरोधक मानलेले नाही. मी सामान्य ओबीसींना एका शब्दाने देखील दुखावले नाही. आम्हाला ओबीसीचां विरोध नाही. थोड्याफार नेत्यांचा विरोध आहे. तुमच्यामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यांचे नेते विनाकारण आमच्या विरोधात जात आहेत. सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे. सगळ्या आमदारांना मराठे आता बोलायला लावणार. असेही ते म्हणाले. 

मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता टिकू शकत नाही- मनोज जरांगे

मराठ्यांची बेमानी करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. सत्ता आली किंवा बहुमताने आलो म्हणून बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता टिकू शकत नाही. एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचे काही खरं नाही. सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही आणि वेड्यावानी करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ती टिकू देणारही नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या