छ. संभाजीराजेंचे मस्साजोगमधील मंत्रीपदाबाबतचे 'खोडा' घालणारे वक्तव्य- माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी 'खोडले' !

बीड: एमबी न्यूज वृत्तसेवा....
       स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांचे सांत्वन करायला आलेल्या छ. संभाजीराजे यांनी मंत्रीपदीबाबत खोडा घालणारे वक्तव्य केलं होतं.या वक्तव्याला खोडणारे वक्तव्य आता माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी केलं आहे.

                 बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर माजी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठे विधान केले आहे. देशमुख खून प्रकरणातील सर्व धोगेदोरे पोलिस तपासतील आणि या प्रकरणामागील जो सूत्रधार आहे, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला पोलिस नक्की शोधून काढतील, असा दावाही त्यांनी केला.
           माजी मंत्री देसाई म्हणाले, एखाद्या खून प्रकरणात आरोपी सापडेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नका, असे म्हणण्यापेक्षा आरोपी पकडायला ज्या काही यंत्रणा लावायच्या आहेत, त्या लावल्या पाहिजेत, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली असती तर ती अधिक योग्य ठरली असती.कुठल्याही खून प्रकरणात सर्व यंत्रणा काम करत असतात. पोलिस प्रशासन तपासाचे सर्व मार्ग धुंडाळत असतात. मी सुद्धा अडीच वर्षे गृहविभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. संतोष देशमुख खून प्रकरणतील सर्व धोगेदोरे तपासतील आणि या प्रकरणामागील सूत्रधार आहे, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला राज्याचे पोलिस नक्की शोधून काढतील, असा दावाही शंभूराज देसाईंनी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना