मस्साजोग येथील घटना अत्यंत दुर्दैवी ;दोषींना कडक शासन करावे -धनंजय मुंडे

मस्साजोग येथील घटना अत्यंत दुर्दैवी ;दोषींना कडक शासन करावे -धनंजय मुंडे

केज: तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येची ही घटना अतिशय दुर्दैवी असून संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत अशा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कोणीही राजकारण करु नये. या प्रकरणात दोषींना कडक शासन करावे अशी मागणी बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

      याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुक वर पोस्ट करून दिवंगत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की,

"बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची दोन दिवसांपूर्वी अपहरण व हत्या झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य कार्यवाही करून दोषींना कडक शासन करावे.

 स्व. संतोष देशमुख यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. 

       या घटनेच्या आडून कुणीही राजकारण साधण्याचे किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करू नये अशी माझी हात जोडून विनंती आहे. गुन्हेगारी ही विकृती आहे आणि विकृतीला कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, या मताचा मी आहे." 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !