श्री. बजरंगबली वेताळ मंदिर येथे आज श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन
भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे-श्री विलासानंदजी महाराज
परळी/प्रतिनिधी
येथील जागृत देवस्थान श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 1 ते 5 वा. महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक प.पू.विलासानंदजी महाराज यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मित्ती मार्गशीर्ष शु.14 शके 1946 शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिरजवळील जागृत देवस्थान श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 12 ते 1 वा. महाआरती, भजन, कीर्तन व दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
या धार्मीक कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री बजरंगबली वेताळ मंदिराचे संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा