संतोष देशमुख माझा बुथप्रमुख, लेकराला न्याय मिळेल
पदभार घेण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे कोल्हापूर महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक
विभागाचा घेतला आढावा ; कार्यकर्ते, उद्योजकांशी साधला संवाद
नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार
कोल्हापूर ।दिनांक २६।
राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे उद्या शुक्रवारी (ता. २७) आपल्या मंत्रालयीन दालनात पदभार घेऊन कामकाज सुरू करणार आहेत. पदभार घेण्यापूर्वी त्यांनी आज कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. मला जे खाते मिळाले आहे ते सृष्टीला वाचवण्यासाठीचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं योगदान मी यात देणार आहे. पर्यावरणाच्या माध्यमातून नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेणार आहे, यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ना. पंकजाताई मुंडे आज कोल्हापूर दौर्यावर होत्या. सकाळी त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचं आ. अमल महाडिक व भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. दर्शनानंतर प्रदुषण नियंत्रण व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, शिवशक्ती परिक्रमेच्या वेळी मी महालक्ष्मीच्या दर्शनाला आले होते. दरवर्षी दर्शनाला येत असते. प्रत्येक वेळी वेगळ्या भूमिका मिळत गेल्या, आता कॅबिनेट मंत्री म्हणून आले आहे. शेवटी महालक्ष्मीचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलेही कार्य सफल होत नाही. राज्याची मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, मला जे खाते मिळाले आहे ते सृष्टीला वाचविण्यासाठीचे आहे, जगभरातून अनेक जण यात योगदान देतात तसं योगदान देण्याची संधी मला मिळाली आहे. मानव जातीला वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचवलं पाहिजे.
नद्यांना प्रदुषण मुक्त करणार
-------
कोल्हापूर येथे पूर्वी मोठा पूर आला होता,याची आठवण आ. महाडिकांशी चर्चा करताना आली.त्यामुळे पर्यावरणाच्या माध्यमातून या भागाला पूर मुक्त करण्यासाठी तसेच प्रदुषण मुक्त नद्यांचे डिपार्टमेंट माझ्याकडेच असल्याने पंचगंगा नदीचं काम हाती घेणार आहे असं ना. पंकजाताई म्हणाल्या.
संतोष देशमुख माझा बुथप्रमुख, लेकराला न्याय मिळेल
---------
मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्येप्रकरणी पत्रकारांनी विचारले असता ना. पंकजाताई म्हणाल्या, या हत्येची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी सर्वात पहिल्यांदा कुणी केली असेल तर ती मी मुंडे साहेबांच्या जयंतीदिनी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर केली. या क्रुर प्रकाराचा मी तीव्र संताप व निषेध केला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यात जातीने लक्ष घालून न्याय्य भूमिका घेवून त्यांना न्याय देतील. संतोष देशमुख माझा बुथप्रमुख होता, सरपंच म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे, देशमुख कुटुंबियांना नक्की न्याय मिळेल असं त्या म्हणाल्या.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा