भाजप विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस : चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांचा प्रस्ताव तर पंकजा मुंडेंनी दिलं अनुमोदन
भाजप विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांचा प्रस्ताव तर पंकजा मुंडेंनी अनुमोदन दिलं .देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी आज (दि. ४) एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांचेच नाव भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे आज (दि. ४) सकाळी १० वाजता भाजप आमदारांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत भाजप गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीयनिरीक्षक म्हणून यांनी भाजपचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता.
महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा बहुमत मिळाल्याने सरकार स्थापन करणार आहे. महायुतीने 230 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 132, शिवसेना (एकनाथ शिंदे) 57 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) 41 जागा जिंकल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा