परळीत रस्त्यावर एकजूटीने उतरली 'विराट हिंदूशक्ती' : तीव्र निषेध नोंदवत बांग्लादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबवण्याची एकमुखी मागणी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बांग्लादेशातील हिंदूवर होणारे अनन्वित अत्याचार थांबवावे या मागणीसाठी आज (१० डिसेंबर) मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून परळीत विराट हिंदू शक्ती एकजुटीने रस्त्यावर उतरली. तीव्र निषेध नोंदवत मानवाधिकार वापरुन बांग्लादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार थांबवण्याची एकमुखी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. या निषेध व जन अक्रोश आंदोलनात परळीतील सकल हिंदू समाज विराट संख्येने सहभागी झाला होता.
बांग्लादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबविण्यात यावे, या मागणीसह हिंदू मंदिरे पाडण्याच्या निषेधार्थ आज 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने राष्ट्रपतींच्या नावे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, बांग्लादेशातील हिंदू व इतर सर्व अल्पसंख्यांकांवर कट्टरवाद्यांकडून होणारे हल्ले, लूटमार, जाळपोळ व महिलांवर होणारे हल्ले रोखण्यात यावेत.हे अत्याचार थांबले पाहिजेत. सध्याचे बांग्लादेश सरकार व इतर संस्था हे थांबवण्याऐवजी मूक प्रेक्षक बनले आहेत. हिंदूंच्या भावना दुखावणार्या व हिंदू मंदिरांना टार्गेट केले जात आहे. याचा सकल हिंदू समाज तीव्र निघेष करते. तसेच हिंदूवरील व त्यांच्या मंदिरावरील हल्ले थांबविण्यात यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौकातून या निषेध आंदोलनास प्रारंभ झाला. राष्ट्रध्वज व भगवा ध्वजधारी महिलांनी या जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले. हा जनआक्रोश मोर्चा राणी लक्ष्मीबाई टावर- स्टेशन रोड- बस स्थानक मार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. एक है तो सेफ है कटेंगे तो बटेंगे चे फलक झळकावत भारत माता की जय, जय श्रीराम ,वंदे मातरम् आदी प्रचंड जयघोष करत हा जन आक्रोश मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून प्रशासनाला निवेदन देत या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. या आंदोलनात निषेध नोंदविण्यासाठी परळी शहरातील हजारोंच्या संख्येने हिंदू धर्मीय समाज बांधव सहभागी झाला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा