महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प.पु. अमृताश्रमस्वामी महाराज विशेष निमंत्रित
बीड, प्रतिनिधी.... बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत म. जोशी नवगण राजुरी) यांना उद्याच्या होणाऱ्या राज्य सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण आले आहे.
महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेकविध पंथ, संप्रदाय, संघटना, संस्था, साधू,संत, महंत, यांना शपथविधी साठी निमंत्रित करण्यात आले आहे. या मध्ये बीड जिल्ह्यातील कीर्तन क्षेत्रात अत्यंत अग्रगण्य असणारे ज्येष्ठ कीर्तनकार नवगण राजुरीचे भूमीपुत्र अमृताश्रम महाराज यांना देखील निमंत्रित करण्यात आले असुन महाराज शपथविधी सोहळ्याला साठी उपस्थित राहणार आहेत. सध्या अमृत आश्रम स्वामी महाराज सुरत येथे कार्यक्रमानिमित्त गेलेले असून त्यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण प्राप्त झाल्यानंतर आता ते थेट सुरत वरून मुंबई येथे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा