थकीत कर्ज का वसुल केले: बॅंक मॅनेजरवर हल्ला : दोन जण जखमी
परळी (प्रतिनिधी)
बॅंकेकडुन घेतलेले कर्जाचा भरणा न केल्याने परळी येथील डॉ.रविंद्र गायकवाड यांचे नियमाप्रमाणे थकीत कर्ज वसुली करणार्या उस्मानाबाद जनता सहकारी बँक परळी शाखेचे शाखाधिकारी प्रशांत गरड यांना मारहाण करत जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून डॉ.रविंद्र गायकवाड यांनी कर्ज घेवून त्याची परतफेड केलीच नाही यासाठी बॅंकेने वेळोवेळी नोटीस पाठवुन नियमाप्रमाणे कारवाई केली.सदरील कारवाईचा राग मनात धरत उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे परळी शाखाधिकारी प्रशांत गरड यांना दि.७ डिसेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास फोन केला.प्रशांत गरड व बॅंकेतील कर्मचारी माधव शिंदे हे दि.७ रोजी दुपारी ३.१५ वाजता कामानिमित्त शाखेबाहेर आले असता घरणीकर रोडवर डॉ.रविंद्र गायकवाड हे तीन ते चार जणांना घेवुन आले व आमच्या मालमत्ता जप्तीबाबत वाद घालत शाखाधिकारी गरड व कर्मचारी शिंदे यांना शिवीगाळ करत एकाने दगडाने मारहाण केली यात गरड यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे तर शिंदे यांनाही मार लागलेला आहे.याबाबत प्रशांत गरड यांच्या फिर्यादीवरून डॉ परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भताने हे करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा