कुटूंब गेले नाशिक त्र्यंबकेश्वरला; तीन लाख 45 हजाराची घरफोडी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवासी असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोग रक्कम असा तीन लाख 45 हजार रुपयांचा ऐवज घरपोडी करून लंपास केल्याची घटना घडली आहे दरम्यान हे कुटुंब नाशिक त्रिंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला गेले होते या कालावधीत घरपोडीची ही घटना घडली आहे
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार फिर्यादी अनिल श्रीधरराव मुंडे रा. शास्त्रीनगर हे पत्नी मुलाबाळासह नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गेले असता दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे बंद घराचे कुलूप कोड्यासह तोडुन घरात प्रवेश केला. बंदरुम मधील कपाट तोडुन कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिणे व दोन लाख तीन हजार रुपये रोख रक्क्म असा एकूण 3,45,000 रुपयाचा ऐवज अज्ञात दोन इसमांनी चोरून घेऊन गेले. याप्रकरणी गुरनं.- 193/2024 कलम 305 (a), 331(4) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि गट्टावार हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा