पाणी वाटप संस्था बरखास्त करा- सतीश कुंडगीर यांची मागणी

परळी वैजनाथ,प्रतिनिधी... कौडगाव घोडा शिवारातील कॅनल नंबर 22/ 23 वरील पाणी वाटप संस्था काहीही कामाची नसून ही पाणी वाटप संस्था बरखास्त करा अशी मागणी युवक नेते सतीश कुंडगीर यांनी केली आहे.

     सध्या माजलगाव पाटबंधारे विभागाच्या वतीने कॅनलला पाणी सोडण्यात आलेअसुन  नवीन लागवड करण्यात आलेल्या तसेच जुन्या उसासाठी हे पाणी अत्यंत गरजेचे आह.  मात्र कॅनाल वरील चाऱ्या आणि पाण्याच्या वाटा बुजलेल्या असल्याने पाणी उपलब्ध असुनही शेतकऱ्यांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.त्यामुळे या ठिकाणी असलेल्या पाणीवाटप संस्था काहीही उपयोगाच्या नसून कौडगाव शिवारातील कॅनल नंबर 22/ 23 वरील पाणी वाटप संस्था बरखास्त करावी अशी मागणी सतीश कुंडगीर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या शिवारातील ऊसाला पाणी मिळावे यासाठी मेहनत करून जेसीबी ऑपरेटरने पाणी शेत शिवारात पोहोचवले याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने या ऑपरेटरचा सत्कारही करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना