शंकर पार्वती नगरमध्ये गीता जयंती निमित्त भगवद्गीता पारायण सोहळा 

परळी वार्ताहर 

दि . 11 /12/ 2024


   येथील शंकर पार्वती नगरमध्ये श्री गुरु साखरेमहाराज प्रासादिक बालसंस्कार केंद्राच्या वतीने  मार्गशीर्ष शु ११ गीताजयंती निमित्त गीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .

            येथील हिंगलाज माता मंदिरामध्ये या गीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .त्यानिमित्त श्रीगुरु साखरेमहाराज बालसंस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थी व शंकर-पार्वती नगर मधील अनेक भाविक भक्तांनी या पारायण सोहळ्यांमध्ये सहभाग घेतला .


       या निमित्ताने *भगवद्गीता सामान्य ज्ञान स्पर्धा* ही आयोजित करण्यात आली होती . त्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवणारे विद्यार्थी व सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . 

कु . अन्वी वळसे , केशव पारगावकर , ओंकार घुगे आणि श्रेयस जगताप या विद्यार्थ्यांनी शंभर पैकी १००  गुण मिळवून प्रथम पारितोषिक प्राप्त केले . तर कु . आराध्या सौंदळे , हिंदवी कानमोडे आणि आयुष डांगे यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले .

           या  सोहळ्यासाठी परळी येथील गीतासेवक श्री संपत महाराज गित्ते गुरुजी व प्रा . डॉ धायगुडे सर यांची विशेष उपस्थिती लाभली .

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा डॉ श्याम नेरकर - सौ रेखा नेरकर व केंद्रातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार