परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

.......निमंत्रण पत्रिका

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उद्या शपथ घेणार

शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर


भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (दि.४) सर्वानुमते निवड झाली. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून उद्या ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता होईल. उद्याच्या शपथविधी सोहळ्याच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.
विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांची गटनेतेपदी सर्वोनुमते निवड करण्यात आली. भाजपचे केंद्रीय निरिक्षक निर्मला सितारामन, विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत गटनेतेपदाची निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उईके मेघना बोर्डीकर, योगेश सागर, संभाजी पाटील-निलंगेकर, गोपीचंद पडळकर, दिलीप गोडसे, आशिष शेलार यांच्यासह इतरांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विजय रूपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते गटनेतेपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा केली.

यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पीएम मोदींच्या नेतृत्त्वाखाली राज्यात डबल इंजिन सरकार आले असून हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे.
महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ २३७ वर
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) २३० जागा मिळाल्या आहेत. तसेच इतर ७ आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ २३७ वर पोहोचले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२, शिंदेंची शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागांवर विजय मिळवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!