विना परवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या व जनावरांच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल;एकुण ४ लाख ७० हजाराची कारवाई
परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी)
महिंद्रा बोलरो पिकअप मधून जनावरांची विना परवाना वाहतूक व जनावरांचा छळ केल्याप्रकरणी येथील एका व्यक्ती विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील अनंत केशव गित्ते याने आपल्या महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच ०४ एचडी ७९३२ मधून तीन बैल व एक गोरा असे एकुण ४ लाख ७० हजाराची जनावरे व एक पीकअप खरेदी विक्रीचा परवाना न बाळगता जनावरांना वेदणा होतील अशारितीने गाडीत एका जागेवरून दुस-या जागेवर गैरवाजवी पणे आखुड जागेत दोरीने बांधुन चारापाणी न करता जनावरांना क्रूर वागणुक देवुन छळ करुन विनापरमीट घेवुन जात असल्या कारणाने ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे. रमेश तोटेवाड करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा