मंगळवारी दुपारी बारापर्यंत बाजारपेठ राहणार बंद !
बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार: परळीत सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध व जनआक्रोश मोर्चाचे आयोजन
व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा; मंगळवारी दुपारी बारापर्यंत बाजारपेठ राहणार बंद
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
बांग्लादेशात हिंदू धर्मीय बांधवांवर होत असलेल्या प्रचंड अन्याय व अत्याचाराच्या विरोधात जागतिक स्तरावर मानवाधिकाराच्या माध्यमातून न्यायाची प्रतीक्षा असून या बांधवावर होणाऱ्या अन्यायाचा प्रखर निषेध नोंदवण्यासाठी दि.१० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सकल हिंदू समाज एकत्र येणार आहे.
परळी वैजनाथ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध व जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निषेध आंदोलनाला उस्फूर्त पाठिंबा देत परळी वैजनाथ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही या जन आक्रोश मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दुपारी बारा वाजेपर्यंत परळीची बाजारपेठ बंद ठेवून व्यापारीवर्गाकडून निषेध नोंदविण्यात येणार आहे. दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी १० वाजता राणी लक्ष्मीबाई टावर येथे सकल हिंदू समाज एकत्रित येऊन निषेध नोंदवणार असून या ठिकाणावरूनच जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. हिंदूधर्मीय बांधवांवर होणाऱ्या अन्यायाबाबत मानवाधिकार आहे की नाही ? असा सवाल उपस्थित करत सकल हिंदू समाज हा अन्याय दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. या निषेध आंदोलनात सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा