जागतिक एड्स पंधरवडा निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जागतिक एड्स पंधरवडा निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांची उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. यात अनेक कर्मचाऱ्यांना तपासणी करून उपचार करण्यात आले.
परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर जागतिक एड्स पंधरवडा निमित्ताने रेल्वेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची तपासणी करून आवश्यक ते उपचार करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक शरद चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल गालफाडे, अविनाश व्हावळे, प्रियंका पोटभरे (डी.आर.डब्ल्यू.), वैभव गुळवे, रेल्वे सुरक्षारक्षक अविनाश गुप्ता, स्टेशन मास्तर तुळशीराम मीना, पांडे, टेक्निशियन दत्तात्रय मुंडे, सहाय्यक टेक्निशियन सुमितकुमार कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा