गोपाळ आंधळे यांची निवड :हार्दिक अभिनंदन!!!

 अखिल  भारतीय ग्राहक पंचायतीची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर !

अध्यक्षपदी चित्रा देशपांडे, सचिव गोपाळ आंधळे तर संघटन मंत्री पदी विजया दहिवाळ यांची निवड 

परळी वैद्यनाथ दि.४(प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत परळी वैजनाथ तालुक्याची कार्यकारणी निवडण्यासाठी बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत परळी वैजनाथ  तालुका अध्यक्षापदी चित्राताई देशपांडे, तालुका सचिव पदी माजी न.प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, संघटन मंत्रीपदी विजयाताई दहिवाळ, तर विधी सल्लागारपदी ॲड.अशोक शहाणे व ॲड. वैजनाथ वांजरखेडे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना देश पातळीवर ग्राहकांच्या संरक्षणासाठी निर्माण झाली असून, या समितीची परळी वैजनाथ तालुक्याची कार्यकारणी निवडण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली परळी येथे बैठक संपन्न झाली. यानंतर परळी वैजनाथ तालुक्याची नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली .यामध्ये परळी तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या चित्रा देशपांडे सचिव पदी नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे संघटन मंत्रीपदी  समाज सेवीका विजया दहिवाळ विधी सल्लागार पदी ॲड. अशोक शहाणे अँड .वैजनाथ वांजरखेडे, कोषाध्यक्षपदी विद्या खिस्ती ,उपाध्यक्षपदी शोभा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली तर या समितीच्या सदस्य पदी अनिता माळवतकर ज्ञानेश्वरी चाटे संध्या सर्व दे सुनीता बोडके अपर्णा वेताळ सुनिता नरंगलकर डॉक्टर आनंद टिंबे प्रीती टाक तारा अग्रवाल रुक्मिणी अग्रवाल तारामती बनसोडे आदींची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी या समितीमध्ये कशा पद्धतीने ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करावे याबाबत पुढील प्रमाणे सूचित केले आहे.


दिवसेंदिवस ग्राहकांचे न्याय आणि हक्क राजरोसपणे पायदळी तुडवले जात आहेत त्यामुळे सामान्य माणूस जेरीस आलेला आहे. त्यातच  वाढत्या महागाईमुळे त्यांना जीवन जगणे अवघड होत चालले आाहे. ग्राहकांपर्यत जीवनावश्यक वस्तू पोहोचणेही दुरापास्त झाले आहे. शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्याशिवाय प्रवेश मिळेनासे झाले आहे. शासकीय योजनांना भ्रष्टाचाराची गळती लागल्याने नागरिकांपर्यत एक रुपयातील पंधरा पैसे जाईनासे झाले आहे.

 जनसामान्य माणसाचे स्वातंत्र्य धोक्यात येते की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या हितांचे प्रश्न हाताशी घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या गाध्यमातून आपणासारखे ध्येयवादी कार्यंर्ते गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत आहेत. त्यामूळे समाजात लोकशिक्षण व लोकजागृतीचे कार्य वृध्दींगत होत आहे. आपण करत असलेल्या कार्य अहवालानुसार आपली नियुक्ती करण्यात येत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उदिष्ट ध्येय धोरणानुसार आपणाकडून कार्य अपेक्षित आहे. 

या बैठकीस राज्य कार्यकारणी वरील गंगाधर कानेटकर अशोक कोकणावर यांचीही उपस्थिती होती या बैठकीचे सूत्रसंचालन विजया दहिवाळ यांनी केले प्रस्ताविक चित्रा देशपांडे तर आभार प्रदर्शन गोपाळ आंधळे यांनी केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार