धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षकांना पत्र

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे - धनंजय मुंडे

संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जावे, धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षकांना पत्र


या प्रकरणाच्या आडून कुणीही राजकारण आणि जिल्ह्याची बदनामी करू नये - धनंजय मुंडे यांचे आवाहन


परळी वैद्यनाथ (दि. 12) - मस्साजोग येथील सामाजिक कार्यकर्ते स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी व गंभीर स्वरूपाचे आहे. या स्वरूपाची गुन्हेगारी हे समाज विघातक असून अशा वृत्तीला वेळीच ठेचले गेले पाहिजे, यासाठी या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे असे मत धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. 


आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना याविषयी आपले मत व्यक्त केले. 


अशा स्वरूपाची गुन्हेगारी ही घातक असून पुन्हा वेळीच कठोर शासन केले जावे व देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे असेही धनंजय मुंडे म्हणाले. 


संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केली जावी तसेच हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जावे या संदर्भात धनंजय मुंडे यांनी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनाही दिले आहे. 


गुन्हेगारी ही एक अपप्रवृत्ती आहे, तिला जात नसते, मात्र या प्रकरणाचा अडून काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा  तसेच या दुर्दैवी घटनेच्या आडून राजकारण साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 


पवनचक्कीच्या संदर्भातील कामाच्या वादातून ही हत्या झाल्याचे समजते, मात्र जाणीवपूर्वक याआडून बीड जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा तसेच न्यायव्यवस्था या माध्यमातून संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल, कुणीही नाहक जिल्ह्याची बदनामी करू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना